‘आई पोट दुखतंय’, 10 वर्षाच्या मुलीची आईकडे तक्रार; सत्य समोर आल्यानंतर हादरले; 60 वर्षांच्या नराधमाकडून तिच्यासह बहिणींवर लैंगिक अत्याचार

महिला अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नसरापूर हत्याकांड प्रकरणाची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवड येथे एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका 60 वर्षांच्या नराधमाने दोन सख्ख्या बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घराशेजारीच राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर त्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. इतकंच नव्हे तर अत्याचारानंतर नराधम पीडित मुलींना पोट कापायची धमकी द्यायचा. यामुळं पीडित मुली घाबरल्या होत्या. पीडित मुलींपैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्या नंतर तिच्या कुटुंबियांना ही धक्कादायक घटना कळाली आहे.

या प्रकरणात पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी आणि संतप्त नागरिकांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काल रात्री वाकड पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वाकड पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे कुटुंबीय तसेच आरोपीचे कुटुंब मजुरीचे काम करतात. घटनेच्या दिवशी घरातील सर्व जण कामावर गेली होती. यावेळी चौथीतील 10 वर्षांची मुलगी आणि तिची 4 वर्षांची लहान बहीण दोघीच घरी होत्या. त्याचवेळी आरोपीने 10 वर्षांच्या चिमुरडीला बळजबरीने स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसंच, तिला धमकीदेखील दिली होती.

दरम्यान, पीडित मुलींपैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्या नंतर तिच्या कुटुंबियांना ही धक्कादायक घटना कळाली आहे. तसंच, मोठ्या मुलीने घरात आजीला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक म्हणजे, आरोपीने 10 वर्षांच्या मुलीवर मे ते जुलै 2026 या कालावधीत अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच, कोणाला काही सांगितल्यास चाकूने पोट चिरण्याची धमकी देऊन आरोपीने अत्याचार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *