हवं तर राज्याबाहेर राहण्याची अट ठेवा, पण जेलमधून बाहेर काढा, रमेश म्हात्रेंची कोर्टाकडे विनवणी

कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात जामीन मिळावा यासाठी अक्षरश: विनवणी केल्याची माहिती समोर येत आहे. रमेश म्हात्रे यांच्याकडून वारंवार जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे. याआधी झालेल्या सुनावणीवेळी हायकोर्टाने रमेश म्हात्रे यांच्या वकिलांना खडेबोल सुनावले होते. “रमेश म्हात्रे 25 वर्षाचा तरुण असल्यासारखे डॉक्टरांना मारहाण करतानाच्या व्हिडीओत भासतात. त्यांनी महिलांनाही मारहाण केली. त्यामुळे त्यांना काही दिवस कोठडीत राहू द्या”, असं हायकोर्टाने म्हटलं होतं. यानंतर आज पुन्हा या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी रमेश म्हात्रे यांनी जामिनासाठी हायकोर्टाकडे विनवणी केली.

“माझे वय पाहता मला जामीन मंजूर करावा, हवे तर महाराष्ट्राबाहेरच राहायचे, यासह कठोर अटी घालाव्यात”, अशी विनंती न्यायालयीन कोठडीमुळे तुरुंगात असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी वकिलांमार्फत हायकोर्टाला केली. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशनची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील आज वैयक्तिक कारणामुळे कोर्टात उपस्थित नसल्याने हायकोर्टाने त्या विनंतीबाबत कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही. हायकोर्टाने आता पुढील सुनावणी शुक्रवारी (31 जुलै) दुपारी ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *