काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्याकडून ज्या कंपनीने जमीन विकत घेतली अशा एका कंपनीवर अंमलबजावणी संचलनालयाने सोमवारी छापे टाकले.
ऍलेजेनी फिनलीज लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. वद्रा यांनी 2009-10 मध्ये ही जमीन 79 लाख रुपयांना विकत घेतली होती. पुढील वर्षी ती जमीन वद्रा यांनी ऍलेजेनी फिनलीज कंपनीला साडेपाच कोटी रुपयांना विकली.
यासंदर्भात संबंधित कंपनीवर अंमलबजावणी संचलनालयाने छापे टाकले आहेत.
रॉबर्ट वद्रा यांची जमीन घेणाऱ्या कंपनीवर छापे
