एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण-CSMT लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.५४ वाजता मुंबईच्या निघणाऱ्या वातानुकूलित (एसी) लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. एका दरवाजातूनच लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. त्यामुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दरवाजा बंद करण्यास मदत केली. त्यानंतर ही लोकल ‘सीएसएमटी’कडे रवाना झाली.

प्रवाशांना बाजूला करत दरवाजा बंद केला

कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या एसी लोकलमध्ये सहजपणे चढता-उतरता यावे, यासाठी प्रवासी फलाटावर रांगा लावतात. गाडी थांबल्यानंतर प्रवासी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतून लोकलमध्ये प्रवेश करतात. मात्र सकाळी ८.५४ वाजता मुंबईकडे जाणारी एसी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक-५वर दाखल झाल्यानंतर तिचे बहुतांश दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली. लोकलचा एकच दरवाजा उघडा असल्याने जागा मिळवण्यासाठी प्रवाशांनी त्याकडे धाव घेतली. परिणामी दरवाजाजवळ प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाल्याने रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यांनी प्रवाशांना बाजूला करत दरवाजा बंद करण्यास मदत केली आणि लोकल मार्गस्थ करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *