एका साडीमुळं बायकोने पतीच्या डोक्यात घातला कुकर, हत्या लपवण्याचा प्रयत्न, पण मुलानेच हाणून पाडला डाव

बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरुन पत्नीने पतीचा जीव घेतला आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण बदलापूर परिसर हादरला आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन तिला ताब्यात घेतले आहे. तसंच, बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

पतीने साडी दिली नाही या रागातून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरातील शिरगावात सोमवारी घडली आहे. या प्रकरणात बदलापूर पोलिसांनी आरोप पत्नीला अटक केली आहे. सुनीतादेवी असं आरोपी महिलेचे नाव असून ह

हरेराम सिंग व सुनीतादेवी यांच्यात जोरदार वाद झाला होता. यावेळी त्यांचा सात वर्षाचा मुलगाही घरातच होता. या वादाची सुरुवात पतीने साडी न दिल्यावरून झाली होती. त्यानंतर, सुनीतादेवीने हरेराम याच्या डोक्यात कूकर मारला व गळा घोटून हत्या केली.

हरेराम हा दिव्यांग असल्यामुळे तो अंथरुणावरच होता. या दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला आरोपी महिलेने पुोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सात वर्षांच्या मुलाला जबाब घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी सुनीतादेवीला अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी संध्याकाळी सुनीतादेवी आणि हरेराम यांच्यात साडीवरुन वाद सुरू झाला. त्यानंतर त्यांचा 7 वर्षांचा मुलगा शेजाऱ्यांना हे सगळं सांगायला गेला. मात्र शेजाऱ्यांनी घरी येऊन पाहताच हरिराम सिंग हा मृत अवस्थेत होता. यानंतर हरिरामला रुग्णालयात घेऊन जात असताना हा मृत्यू नैसर्गिक भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण शवविच्छेदन अवहाल आल्यानंतर हरिराम याची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून हरिराम सिंगची पत्नी सुनिता देवीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *