आता वर्ल्ड कप विजेत्यांना डबल गिफ्ट! पहिल्यांदाच मेडल सोबत चॅम्पियन खेळाडूंना रिंग सुद्धा देणार FIFA

फिफा वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना सुरु होण्यापूर्वी फिफाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. फुटबॉल वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच चॅम्पियन बनणाऱ्या संघाला फक्त ट्रॉफी आणि गोल्ड मेडल नाही तर एक खास चॅम्पियन रिंग सुद्धा देण्यात येईल. फुटबॉल वर्ल्ड कपच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होईल जेव्हा विजेते खेळाडू आणि संघाला विशेष सन्मान मिळेल. फिफाचा म्हणणं आहे की विजेत्या संघाला भेट म्हणून ही रिंग देण्यामागे त्यांना मिळालेल्या ऐतिहासिक विजयाची आठवण यांच्याकडे पुढील अनेक वर्ष त्यांना रहावी असा उद्देश आहे.

कशी असणार चॅम्पियन रिंग? 

फिफाच्या म्हणण्यानुसार रिंगच्या एका भागावर वर्ल्ड कप ट्रॉफीची डिजाईन असेल तर दुसरीकडे विजेता संघाच्या हिशोबाने विशेष डिजाईन केली जाईल. तसेच प्रत्येक रिंगवर एक वेगळा सिरीयल नंबर असेल तो खेळाडूंशी संबंधित कस्टमाइज केला जाईल. यासोबत प्रामाणिकतेचं अधिकाधिक सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येईल.

फायनल सामन्यानंतर कोणाला मिळणार पहिली रिंग? 

फिफाने सांगितलं की फायनल संपल्यावर लगेचच विजेता संघाचा कर्णधार आणि हेड कोच यांना प्रतीकात्मक चॅम्पियनशिप रिंग देण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण संघ आणि स्टाफसाठी अशा एकूण 30 कस्टमाइज्ड रिंग बनवल्या जातील. वर्ल्ड कप संपल्यावर एक समारोह आयोजित करून यात खेळाडूंना ती रिंग दिली जाईल.  या विशेष अंगठीची लिमिटेड एडिशन तयार केली जाईल. फिफा एकूण 2,026 चॅम्पियनशिप अंगठ्यांची निर्मिती करेल. यापैकी 30 अंगठ्या विश्वविजेत्या संघाला दिल्या जातील, तर उर्वरित 1,996 अंगठ्या अधिकृत परवानाप्राप्त उत्पादने म्हणून जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी विक्री करता उपलब्ध असतील.

स्पेन आणि अर्जेंटिनामध्ये होणार फायनल : 

फिफा वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना हा गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणार आहे. स्पेन संघाने सेमी फायनलमध्ये फ्रांसला दणका दिला आणि फायनलचं तिकीट मिळवलं. तर अर्जेंटिनाने इंग्लंडला 2-1 ने पराभूत करून दुसऱ्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवलं.

कुठे पाहाल वर्ल्ड कपचा सामना? 

फिफा वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना हा भारतीय वेळेनुसार 20 जुलै रोजी रात्री 12: 30 वाजता होणार आहे. हा सामना भारतात टीव्हीवर युनाइटेड 18 या चॅनलवर पाहता येईल तर याचे थेट प्रक्षेपण झी 5 अँप आणि वेबसाईटवर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *