एसी लोकलमधील AC तब्बल 15 मिनिटे बंद, प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास, 3 महिला बेशुद्ध, मुलुंड स्थानकात नेमकं घडलं काय?

मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. मात्र कधीकधी याच जीवनवाहिनीमुळं मनस्तापही झेलावा लागतो. असाच मनस्ताप आज मुलुंड रेल्वे स्थानकात प्रवाशांना सहन करावा लागला आहे. मुलुंड रेल्वे स्थानकात एसी लोकलमधील एसी बंद झाले त्यामुळं प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. 3 महिला प्रवासी बेशुद्ध झाल्या असल्याची माहिती मिळतेय.

मुलुंड रेल्वे स्थानकातील प्लेटफॉर्म क्रमांक 2वरील एसी लोकलमधील एसी अचानक बंद पडला. तब्बल 15 मिनिटांपासून एसी बंद होता. तसंच, दरवाजे आणि खिडक्याही बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. तसंच, सकाळी 9.30 ते 9.45च्या दरम्यान हा प्रसंग घडला होता.

सकाळच्या वेळेत नागरिकांना ऑफिस टायमिंगच्या वेळेतच हा प्रकार घडला आहे. ऑफिस टायमिंग असल्याने लोकलमध्येही प्रवाशांची गर्दीही होती. त्यातच एसी बंद झाल्याने आणि दरवाजे-खिडक्या बंद असल्याने आत हवा येण्याची काहीच संधी नव्हती. त्यामुळं आतमध्ये प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळं काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्या.

एसी बंद झाल्याने तीन महिला प्रवाशी बेशुद्ध झाल्या होत्या. लोकलमधील इतर महिला प्रवाशांनी लगेचच त्यांची मदत करत प्रशासनाना कळवले. त्यानंतर महिला प्रवाशांची मदत रेल्वे स्थानकावरील इतर प्रवाशांनी केली. मात्र गर्दीच्या वेळीच लोकलमधील एसी बंद झाल्याने रेल्वेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एसी लोकलचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. एसी लोकलच्या छताला गळती लागल्याचे या व्हिडिओत दिसत होते. मुंबईत एक आठवड्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. त्याचाच फटका एसी लोकलला बसला आहे. एसी लोकलमधून पाणी गळत असल्याने महिलांनी छत्री व रेनकोट घालून लोकलमध्ये बसले होते. अशाप्रकारे लोकलमध्ये पाणी गळत असल्याचे पाहून प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *