अवघ्या सहा दिवसांत मुंबईला झोडपलं, कुलाब्याची जुलैची सरासरी पार, शहरात दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत किती जणांनी जीव गमावला?

मुंबईमध्ये जूनअखेरीस महिनाभरात फारसा पाऊस नसल्याने पाऊसमानाची सरासरी गाठता आलेली नव्हती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली. त्यामुळे जूनची सरासरी ओलांडून कुलाबा येथे पावसाने अवघ्या सहा दिवसांमध्ये जुलैच्या पावसाचीही सरासरी ओलांडली आहे.

जुलैची सरासरी ओलांडण्यासाठी मदत

१ जूनपासून ६ जुलैच्या सकाळी ८.३०पर्यंत कुलाबा येथे १२६४.५, तर सांताक्रूझ येथे १३१४.८ मिलीमीटर पाऊस झाला. कुलाबा केंद्रावर जुलैअखेरपर्यंत एकूण १२५१.९ मिलीमीटर, तर सांताक्रूझ केंद्रावर १३३२.५ मिलीमीटर पाऊस पडतो. रविवारी, ५ जुलै ते सोमवारी, ६ जुलैच्या सकाळी ८.३०पर्यंत मुंबईमध्ये कुलाबा येथे १२८, तर सांताक्रूझ येथे १५९.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे जुलैची सरासरी ओलांडण्यासाठी मदत झाली. केवळ मुंबईच नाही, तर कोकण विभागामध्ये विविध तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची उपस्थिती होती. तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *