पश्चिम रेल्वे येथील वांद्रे रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या गरीब नगर येथील अनधिकृत अतिक्रमण याचवर्षी मे महिन्यात हटवण्यात आलं. दोन ते तीन दिवस सुरु असलेल्या या पाडकाम अनेकांची घर, दुकान, लहान फॅक्ट्री आणि धार्मिक स्थळ येथून हटवण्यात आली. यावेळी दोन दिवस ही अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु असताना काही प्रार्थना स्थळ जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा याठिकाणी मोठी दगडफेक झाली आणि पोलिसांवर आणि अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केला. मुंबई पोलिसांनी देखील या हल्ल्याला प्रतिउत्तर दिल्याने स्थिती वेळीच सावरण्यात यश आलं. मात्र या प्रकारानंतर धमक्यांचे अनेक फोन मुंबई पोलिसांना आले बुधवारी सुद्धा असाच एक धमकीचा फोन कॉल आला ज्याने अख्ख पोलिसखातं खडबडून जागं झालं.
पाकिस्तानातून थेट रेल्वे पोलिसांना फोन :
पोलिसांनी दिली माहिती :
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास रेल्वे पोलिसांच्या सुरक्षा विभागाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून कॉल आला. पहिला फोन कॉल केला असता त्यावर कोणीही बोललं नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा फोन आला आणि त्यावर समोरच्या व्यक्तीने मुंबईतून बांद्रा येथे जाण्याचा मार्ग विचारला. त्यानंतर संबंधित पोलिसाने सांगितलं की ‘मुंबईतच बांद्रा आहे’. त्यानंतर समोर फोनवरची व्यक्ती म्हणाली की , ‘तुम्ही बदमाशी करू नका’ त्यानंतर फोन ठेवण्यात आला. हा फोन कॉल केवळ माहिती विचारण्यासाठी करण्यात आलेला की यामागे काही वेगळं कारण होतं याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. सुरक्षा यंत्रणेने कॉलची तांत्रिक माहिती दिली असून स्रोत तपासण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांकडून सादर घटनेबाबत अधिक तपास सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.
