ठाणेकरांनो पाणी भरुन ठेवा, 12 तास पुरवठा बंद राहणार, महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन

जून महिना जवळपास संपत आला तरी राज्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्यातील जलसाठा खूप कमी होत चालला आहे. अल-निनोमुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे यावर्षी पावसाळा सरासरी पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. हा पाऊस इतका कमी पडतोय की, आता जुलै महिना उजाडेल तरी अपेक्षित पाऊस पडताना दिसत नाही. यामुळे संभाव्य पाणी टंचाईचा धोका लक्षात घेता आता प्रशासनदेखील सतर्क झालं आहे. ठाण्यात जलसंपदा विभागाच्या कळवा पाटबंधारे विभागाने पाण्याचे संवर्धन करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ठाणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ठाणे महानगरपालिकेस मे. स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होतो आहे. संभाव्य पाणी टंचाईचे संकट विचारात घेता महापालिकेला जलसंपदा विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार बुधवारी 1 जुलैरोजी सकाळी 9 ते गुरूवार 2 जुलै सकाळी 9 वाजेपर्यत असा 24 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवावा, असे स्टेम प्राधिकरणाने कळविले आहे.

एक वेळचा पाणी पुरवठा चालू राहणार

त्यानुसार येत्या बुधवारी सकाळी 9 वाजेपासून ते गुरूवारी 02 जुलैच्या सकाळी 9.00 वाजेपर्यत मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. असं असलं तरी ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

या भागांमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत पाणी येणार नाही

या अनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, रेतीबंदर आणि मुंब्र्याचा काही भाग आदी ठिकाणांचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत बंद राहील.

या भागांमध्ये रात्रीचे 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी येणार नाही

समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रुस्तमजी, दोस्ती, आकृती, वर्तकनगर (म्हाडा) इत्यादी भागात बुधवारी रात्री 9 ते गुरूवारी सकाळी 9 वाजेपर्यत बंद राहील, अशा रितीने टप्याटप्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

ठाणे महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन

या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

ठाणे शहरातील पाणी पुरवठा बंद होण्याच्या निर्णयावर आपले काय विचार आहेत? कृपया आपले मत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *