बँकेतील काही महत्त्वाचे काम करायची असतील तर ती लवकर करुन घ्या. 26 ते 30 जून दरम्यान 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत देशभरातील विविध राज्यांमध्ये बँकाना सुट्टी आहे. त्यामुळे, बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासून घ्या. जाणून घेऊया महाराष्ट्रात कधी सुट्टी आहे.
26 जून ते 30 जून 2026 या कालावधीत, विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्टा असणार आहेत. एकूण पाच बँक सुट्ट्या असतील. या सुट्ट्यांमध्ये प्रादेशिक सण, रविवार आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे. या सुट्ट्या प्रत्येक राज्यात वेगळ्या आहेत. 26 ते 30 जून दरम्यान कोणत्या दिवशी आणि कोणत्या राज्यांमध्ये बँका बंद असतील याचे वेळापत्रक समोर आले आहे.
26 ते 30 जून 2026 पर्यंतच्या बँक सुट्ट्यांची यादी
26 जून, 2026 (शुक्रवार): मोहरम/आशुराच्या निमित्ताने दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, पाटणा, श्रीनगर, भोपाळ, रांची, रायपूर, नागपूर, जम्मू, कानपूर, बेलापूर, ऐझॉल आणि अगरतळा येथील बँका बंद राहणार आहेत.
27 जून, 2026 (शनिवार): महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरात बँकेला सुट्टी आहे.
28 जून, 2026 (रविवार): साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
29 जून, 2026 (सोमवार): संत गुरु कबीर जयंतीनिमित्त शिमला येथील बँका बंद राहतील.
30 जून, 2026 (मंगळवार): रेमा नी उत्सवानिमित्त आयझॉलमधील बँक शाखा बंद राहतील.
डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध
बँकेला सुट्टी असली तरी UPI, ऑनलाईन पमेंट, डेबिट कार्ड, ATM कार्ड यासारख्या डिजीटल सेवा सुरु राहणार आहेत. डिजीटल सेवांच्या मदतीने पैशांची देवाण घेवाण करता येऊ शकते. सुट्टीच्या दिवशीही खात्याशी संबंधित बहुतांश सुविधा इंटरनेट बँकिंगद्वारे उपलब्ध राहतील.
