आजोबा अन् वडिलांच्या पावलावर पाऊल, नाशिकच्या श्रुतीची उत्तुंग भरारी, अधिकारीपदी निवड; अमृते परिवारातील तिसरी पिढी भारतीय वायूसेनेत

सैनिकाच्या कुटुंबात जन्मलेल्या श्रुती अमृते या विद्यार्थिनीने तिच्या आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जिद्द, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर भारतीय वायूसेनेच्या अधिकारीपदासाठीच्या परीक्षेत देशपातळीवर १५वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. वायूसेनेत कुटुंबातील तिसरी पिढी बनवण्याचा मान मिळवला आहे.

आजोबा भारतीय वायूसेनेत फ्लाईंग ऑफिसर

श्रुतीचे आजोबा रमेश अमृते हे भारतीय वायूसेनेत फ्लाईंग ऑफिसर तर वडील सचिन अमृते हे वायूसेनेत सार्जंट होते. त्यामुळे तिचे शालेय शिक्षण विविध वायूसेनेच्या तळांवर झाले. इयत्ता चौथीत असनाताच तिने आपणही वायुसेनेत काम करायचे निश्चित केले आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. नाशिकला आल्यानंतर दिल्ली पब्लिक स्कूलमधून (डीपीएस) तिने इयत्ता दहावी व बारावीत उत्कृष्ट गुण मिळविले. पुढे तिने नाशिकच्या बी.वाय. के महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत ७८ टक्के गुण मिळवित पदवी प्राप्त केली. सध्या ती मुंबईतील लाला लजपत राय महाविद्यालयातून वित्त विषयात एमबीएचे शिक्षण घेत आहे.

लहानपणापासूनच सशस्त्र दलात प्रवेश करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या श्रुतीने आपल्या पहिल्याच प्रयत्नात सैन्य दलासाठी ‘एसएसबी’ची शिफारस मिळवली होती. मात्र, अखिल भारतीय क्रमवारीत ४३वा क्रमांक मिळाल्याने ती प्रतीक्षा यादीत राहिली. तरीही तिने खचून न जाता अथक परिश्रम सुरु ठेवले. तिने ‘एएफसीएटी’ ०२/२०२५ ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आणि गांधीनगर येथे झालेल्या एसएसबी मुलाखतीत नंतर गुणवत्ता यादीत अखिल भारतीय पातळीवर १५वा क्रमांक मिळवित उल्लेखनीय यश प्राप्त केले होते. ती हैदराबाद येथील एअर फोर्स अकॅडमी, डुंडीगल येथे प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे.

श्रुतीची उल्लेखीय कामगिरी

श्रुतीची शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

जलतरण स्पर्धेत तिच्याकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

आंतरराष्ट्रीय समुद्र जलतरण स्पर्धांमध्येही सहभाग

राष्ट्रीय क्रीडा मंत्र्‍यांच्या हस्ते श्रुतीचा गौरव

‘एनसीसी’त श्रुतीला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून गौरव

तिला गोल्डन एसयूओ रँक मिळाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *