राज्याची उपराजधानी नागपूरमधील मोठा ताजबाग परिसरातील तावीज नगर येथील एका मदरशात अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 अल्पवयीन मुलांना रेस्क्यू केले असून त्यापैकी दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती समोर. पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली.
सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी
या मदरशात बिहार आणि मध्य प्रदेश येथून धार्मिक शिक्षणासाठी आलेली मुले राहत होती. पोलिसांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर मुलांची चौकशी करण्यात आली असता एका 14 वर्षीय मुलाने लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा आरोप केला. त्यानंतर सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मदरशामधील 26 वर्षीय अताय रसूल उर्फ तानीफ याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
रात्री साधारण 3 वाजताचा घटनाक्रम सांगितला
या साऱ्या प्रकाराचा वाचा फोडणाऱ्या 14 वर्षीय मुलाने 18 जून रोजी रात्री साधारण 3 वाजता झालेल्या घटनेची तक्रार केली. इतर मुलांवरही अशाच प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्याचे आरोप झाले आहेत. मुलाने मदरशाच्या व्यवस्थापकाला सांगितले. व्यवस्थापकाने आरोपीला समजावले, पण तो पोलिस तक्रार होण्याची शक्यता कळताच पळून गेला. पीडित मुलाने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार केली, त्यानंतर महिला व बाल विकास विभागाच्या हेल्पलाइनद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचली.
सखोल चौकशीची मागणी
दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी आपण स्वतः तक्रार दिली असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले. तसेच राज्यातील मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक सूचना देण्यात आली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
पुणे आणि भिवंडीमध्येही झालाय असा प्रकार
अशाप्रकारे मदरशामध्ये मुलावर अत्याचार झाल्याची ही काही पहिली वेळ नाही. 2024 भिवंडीमधील मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. या प्रकरणामध्ये 20 वर्षीय आरोपी नसिरुल्ला फरार आहे. 2018 एका मदरशातून 36 विद्यार्थ्यांना सोडवण्यात आले. या प्रकरणामधये मौलाना आणि शिक्षकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. 18 वर्षांखालील मुलांविरुद्ध कोणत्याही लैंगिक अत्याचाराला लागू होतो. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग किंवा महिला आयोगाकडून अशा प्रकरणांची दखल घेतली जाते.
