नागपुरात 42 वर्षीय डॉक्टरचा करुण अंत, हॉस्पिटलच्या केबिनचं दार उघडताचं…

नागपुरातून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 42 वर्षीय डॉ. ईश्वर चांदेवार या डॉक्टरांनी स्वतः इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली आहे. न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून हे डॉक्टर कार्यरत होते. घटनास्थळी बधिरीकरणाचे इंजेक्शन आढळल्यान, इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कौटुंबिक तणावातून आत्महत्येचे पाऊल उचलले का, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

सोमवारी सकाळी नियमित कामे पूर्ण करून डॉक्टर कक्षात गेले होते, दीड ते दोन तास बाहेर न आल्याने सहकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी दार ठोठावले. बराचवेळ दरवाजा न उघडल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी  पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर कक्षात डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळले, तपासणीत मृत्यू स्पष्ट झाला आहे. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट, डॉक्टर काही दिवसांपासून तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इंजेक्शनचा ओव्हरडोज, हृदयविकाराचा झटका की आत्महत्या असा देखील संशय व्यक्त करण्यात आला आहे.  पोलिसांकडून नातेवाईकांची चौकशी आणि मोबाईलची तपासणी सुरु आहे. तेसच डॉक्टर ईश्वर यांचा प्रेमविवाह असून केलेल्या डॉ. चांदेवार यांना 15 वर्षांचा मुलगा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

सध्या पोलिसांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारात न्यूरॉन हॉस्पिटल येथून माहिती समजली की, तेथील एका डॉक्टरने इंजेक्शन घेऊन स्वतः आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे आमचे अधिकारी असतात ते तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी पाहणी केली असता न्यूरॉन हॉस्पिटलममध्ये 408 नंबरची रूम आहे. तिथे डॉक्टर ईश्वर चंद्र नरहरी चांदेवार वय 42 वर्ष राहणार शिवशक्ती नगर मानेवाडा हे तिथे बसत असतात आणि हॉस्पिटल सर्व मॅनेजमेंट आहे ते पाहतात. सकाळी डॉक्टरच्या स्टाफून माहिती समजली सकाळी अंदाजे सहा वाजच्या दरम्यान ते दवाखान्यात आले होते. आणि त्याच्यानंतर दवाखान्यात राऊंड मारून ते त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले होते. परत त्यांनी नर्स करून काही पाणी वगैरे काही बाकीचे काही वस्तू काही मागणी केली होती. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तसे त्याच्यात दिसत आहेत.

डॉक्टर आले आणि एक दवाखाना राऊंड आयसीयुमध्ये फिरून त्यांच्या रूममध्ये जाऊन बसलेली दिसत आहे. आणि त्यानंतर तर नऊ वाजण्याच्या दरम्यान त्यांचा जो बाकी रेगुलर स्टाफ येतो चेंज तर त्यांनी त्यांना डॉक्टरला फोन लावला तर कोणी काही उचलले नाही. डॉक्टर साहेबांनी दोन तीन वेळेस तर त्यांच्या रूमवर जाऊन त्यांनी दार पण वाजवला तरी त्यांनी काही दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्या स्टाफ तो दरवाजा तोडला तर त्यानंतर त्यामध्ये जो सोपा आहे त्या सोपावर ते पडलेले दिसले. त्यांनी त्यांना शिफ्ट करून आयसीमध्ये नेण्यात आले. त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला काही त्यांच्या लक्षात आले की,  ते मरण पावलेले आहे त्यांच्या रूमची पाहणी केली असता. तिथे काही इंजेक्शन सिरीजच्या द्वारे त्यांनी स्वतः इंजेक्शन घेतल्या अस दिसून आलेल आहे पीम कारवाई निकष झालेला आहे अधिक तपास चालू आहे अशी माहिती साईनाथ रामोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *