पुण्यातील नवले ब्रिज परिसरात रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून पुलावरून खाली फेकल्याच्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. प्रवासी घेण्याच्या वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बापूसो बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपले आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
प्रवासी घेण्याच्या वादातून हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज ते नवले ब्रिज महामार्ग परिसरात प्रवासी घेण्यावरून रिक्षाचालकांमध्ये वाद झाला होता. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. आरोपींनी सुरज माणिक काळे या रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांसह धारदार शस्त्र आणि इतर वस्तूंनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय दाखले आणि तिच्या शरीरावरील जखमांचे सविस्तर विश्लेषण करून त्या ३९ मिनिटांत झालेल्या अत्याचारांचे पुरावे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात मांडले. ‘सीसीटीव्ही फुटेज, ‘डीएनए’चा अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा खोटेपणा उघडा पाडताना संपूर्ण दोषारोप सिद्ध करून त्याला कठोर शिक्षा व्हावी,’ अशी मागणी ॲड. मिसर यांनी न्यायालयाकडे केली. या प्रकरणाचा येत्या २५ जूनला निकाल लागण्याची शक्यता आहे.
चिमुकलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याने पीडितेला दुपारी तीन वाजून १२ मिनिटांनी घटनास्थळाकडे नेले. त्यानंतर, दुपारी तीन वाजून ५१ मिनिटांनी तो त्याच घटनास्थळावरून एकटाच परत येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसते. या तांत्रिक पुराव्यावरून पीडिता ही तब्बल ३९ मिनिटे आरोपीच्या ताब्यात होती, हे सिद्ध होते. यादरम्यान, त्याने पीडितेवर अत्यंत पाशवी अत्याचार व अनैसर्गिक संभोग केला. त्यानंतर, तिची निर्घृण हत्या करून मृतदेह लपवून ठेवला, अशी माहिती विशेष सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयाला दिली.
