पंतप्रधानांच्या हस्तेच पुरस्कार पुन्हा स्वीकारणार- कवी राणा

पंतप्रधानांच्या हस्तेच पुरस्कार पुन्हा स्वीकारणार- कवी राणा

साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे निमंत्रण स्वाकारले असून पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार दिला तरच हा पुरस्कार पुन्हा स्वीकारणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.

देशातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत असून हा मुद्दा मी पंतप्रधान भेटल्यानंतर त्यांच्यासमोर उपस्थित करणार आहे. २० वर्षाचा मुलगा मला जीवे मारण्याची धमकी देतो. मात्र याला मी घाबरणार नाही आणि कधी सुरक्षाही स्वीकारणार नाही, असेही या वेळी राणा यांनी सांगितले.

मुनव्वर राणा हे उर्दू साहित्यक्षेत्रातील नामवंत असून त्यांचे अनेक काव्यसंग्रह आहेत. देशातील विविध घडामोडींना विरोध करत कवी मुनव्वर यांनी साहित्य अकादमी पुरस्कार व एक लाख रुपयांची रक्कमही परत करत असल्याची घोषणा केली होती. मात्र पंतप्रधानांच्या हस्ते हा पुरस्कार पुन्हा मिळणार असेल तर हा पुरस्कार परत स्वीकारणार असल्याचे राणा यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *