नाम फाऊंडेशन देणार ६०० शेतकरी विधवांना मदत

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून शेती समस्येच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या नाम फाऊंडेशनद्वारे येत्या २३ ते २५ तारेखदरम्यान विदर्भातील वर्धा आणि बुलडाणा येथील जवळपास ६०० आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तोंडावर आलेली दिवाळी आणि रब्बीचा हंगाम लक्षात घेता ही मदत दिली जाणार आहे.

वर्धा येथे २३ ऑक्टोबर रोजी स्वाध्याय मंदिरात सकाळी १०.३० वा. मदतनिधी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नंतर वध्र्यापासून जवळच असलेल्या आमला हे गाव फाऊंडेशनने दत्तक घेतले आहे. त्यालाही नाना आणि मकरंद भेट देणार आहेत.

बुलडाणा येथे गर्दे वाचनालयाच्या सभागृहात २५ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. हा कार्यक्रम होईल. तिथून पुढे जळगाव येथे विद्यापीठ सभगृहात जवळपास ४०० शेतकरी विधवा महिलांना मदत दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *