भारत-पाक सीमेवर 50 कोटींचे साहित्य जप्त

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी केलेल्या कारवाईमध्ये 50 कोटी रुपयांचे शस्त्रास्त्रे, दारूगोळा व हेरॉइन जप्त केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) दिली.

फिरोजपूर भागातील धर्मा येथील तपासणी नाक्‍यावरून रविवारी (ता. 19) रात्री हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 10 किलो हेरॉइन, चार पिस्तूल, सात मॅक्‍झिन्स, 95 राऊंडस व दोन पाकिस्तानी सिमकार्ड असलेले मोबाईलचा समावेश आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *