कधी नागमणी, तर गुप्त धन काढून देण्याचं अमिष दाखवून अनेकांची लाखो रुपयांची लूट करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात जळगाव पोलिसांना यश मिळाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ड्रॉप केसमधे,लाखो रुपयांची रोकड,नकली नोटा,वन्य जीवांचे अवशेष सह,गावठी कट्टे जप्त करण्यात आल्याने,पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे
3/11

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर हलखेडा, मधापुरी, लालगोटा, जोधणं खेडा,चार ठाणा या गावात मध्य रात्रीच्या सुमारास मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली.

यासंदर्भात पोलिसांनी तब्बल 55 जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करून त्यातील नऊ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे

सोशल मीडियाच्या माध्यमातून गुप्त धन काढून देण्याच्या बहाण्यासह,पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष देऊन देशभरामधील नागरिकांना आमिष देऊन त्यांना या परिसरात बोलावले जात असे. दुर्गम भागात आल्यावर ,त्यांच्यावर दरोडा घालून,मारहाण करत,बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख रक्कम लुटली जात असे, अशा स्वरूपातील अनेक तक्रारी पोलिसांच्याकडे होत्या.
6/11

वाढत्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या भागात ऑपरेशन ड्रॉप केस राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्यामधे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राजरोस सुरू असलेल्या या टोळीवर पोलिसांची ही एवढ्या प्रमाणातील पहिलीच मोठी कारवाई करण्यात आल्याने या परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे
या कारवाईतील अनेक जंगली प्राण्यांची कातडी आणि इतर अवशेष जमा करण्यात आले.
या कारवाईवेळी सापडलेल्या एक एक गोष्टी पाहून पोलीस अधिकाऱ्यांचे डोळेही आश्चर्याने विस्फारले.

जंगलातील प्राण्यांची कातडी आणि अवशेष
11/11

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई.
