CIDCO चे MD विजय सिंघल यांना मोठा झटका! महाराष्ट्रातील 6 बड्या IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, सरकारने ट्रान्सफर ऑर्डर काढली

महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागात मोठे फेरबदल झाले आहेत.  महाराष्ट्रातील 6 बड्या IAS अधिकाऱ्यांची तकडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सरकाने ट्रान्सफर ऑर्डर काढली आहे. या सहा अधिकाऱ्यांची यादी समोर आली आहे. सिडकोचे MD विजय सिंघल यांची देखील बदली झाली आहे. या बदलीमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली आहे.

सिडकोचे उपाध्यक्ष आणि एमडी विजय सिंघल यांना हटवून त्यांच्या जागी अश्विनी मुदगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय सिंघल यांची बदल धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे.  मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी जोशी यांची बदली करण्यात आलीय. अश्विनी जोशी यांची नियुक्ती आता एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदावर करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी प्राजक्ता वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच आरोग्य विभागाच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची बदली करून त्यांची नियुक्ती एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली आहे. तर आरोग्य विभागाच्या आयुक्तपदी संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *