खडकवासल्यात हिरे व्यापाऱ्याचा गूढ अंत, दोन चपलांमुळे पोलिसांना संशय, अखेर पत्नीला कॉल आला अन् मोठा भांडाफोड

खडकवासल्यात हिरे व्यापाऱ्याचा गूढ अंत, दोन चपलांमुळे पोलिसांना संशय, अखेर पत्नीला कॉल आला अन् मोठा भांडाफोड

१६ कोटींच्या कर्जाच्या ओझ्यात दबलेल्या हिरे व्यापाऱ्याने पुण्यातील खडकवासला धरणात आयुष्य संपवल्याचा बनाव रचला. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या दोन चपला वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या असल्याची बाब पोलिसांच्या नजरेत भरली आणि त्यातून संशयाला सुरुवात झाली. याच धाग्याने तपासाला कलाटणी मिळाली आणि गूढ मृत्यूच्या कथित नाट्यामागचे रहस्य उघड झाले.

संबंधित व्यापारी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून त्याच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन खडकवासला धरण परिसरात शोधून काढले. घटनास्थळी पोहोचल्यावर धरणाच्या काठावर सापडलेल्या पिशवीत व्यापाऱ्याचा मोबाइल आणि चिठ्ठी मिळाली. प्रथमदर्शनी हे जीव देण्याचे प्रकरण असल्याचेच चित्र उभे राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *