अकोल्यात तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या कारवाईच्या धसका; भीतीनं अज्ञात दुकानदारांनी हजारो पेप्सी (कुल्फीचा प्रकार) फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
2/7
अकोल्यातील पळसोद फाट्या दमयान, हजारो पेप्सी पडलेल्या आढळल्या. यामुळे परिसरात उडाली एकच खळबळ.
3/7

अकोल्यात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीनं अज्ञात दुकानदारांनी हजारो रुपयांच्या पेप्सी रस्त्यालगत फेकून दिल्या. एकंदरीत आज तुकाराम मुंढेंचा धसका अकोल्यात दिसू लागला आहे.
4/7

अकोला अकोट रस्त्यावरील पळसोद फाट्यादरम्यान, हजारो पेप्सी आढळून आल्या आहे. कुणीतरी अज्ञात दुकानदारांकडून हा संपूर्ण पेप्सीचा माल फेकून दिलाय.
5/7

कदाचित फेकून देण्यात आलेले पेप्सी भेसळयुक्त असू शकतात, त्याच भीतीने हा संपूर्ण माल फेकण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ सुद्धा उडाली होती.
6/7

आज अकोल्यातल्या चौहट्टा बाजार येथे विविध भागात अन्न व औषध विभागाच्या पथकाकडून विविध ठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत. चौहट्टा बाजार येथील अनेक दूध डेअरीवर पथकाकडून तपासणी सुरू आहे.
7/7

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाकडून अकोल्यात विविध ठिकाणी दुकानांमध्ये जाऊन तपासणी केली जात आहे.
