कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण, जयपूरच्या आंदोलनात जमावाकडून हल्ला

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण, जयपूरच्या आंदोलनात जमावाकडून हल्ला

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिजीत दीपके यांच्यावर राजस्थानच्या जयपूर येथे हल्ला करण्यात आला आहे. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात आज कॉक्रोच जनता पार्टीचे राजस्थानच्या जयपूर येथे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. या आंदोलनात तरुणांची प्रचंड मोठी गर्दी जमा झालेली होती. या गर्दीत अभिजीत दीपके यांना त्यांच्या एका कार्यकर्त्याने खांद्यावर उचलून घेतलं होतं. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली जात होती. आंदोलन एकदम जोरात सुरु होतं. पण याचवेळी गर्दीचा फायदा घेत एक जमाव अभिजीत दीपके यांच्या जवळ आला. या जमावाकडून अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला करण्यात आला.

अभिजीत दीपके यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत पांढरा शर्ट परिधान केलेले अभिजीत दीपके यांना त्यांच्या एका कार्यकर्त्याने खांद्यावर घेतलेले बघायला मिळत आहे. ते भर गर्दीतून आंदोलनात पुढे जात आहेत. याचवेळी एक जमाव अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला करतो. अज्ञात एक इसम अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावतो. तसेच इतरही काही जण हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी मोठा गोंधळ उडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *