कॅन्सर उपचारांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार? औषधांच्या किंमतीत होणार वाढ, केंद्र सरकारची मंजुरी

कॅन्सरचा आजार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यामुळे मागील काही वर्षामध्ये सातत्याने कर्करोगापासून दूर राहण्यासाठी अनेक शिबिरांचे आयोजन केले जाते. देशभरामध्ये अनेक कॅन्सरचे रुग्ण आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आढळतात. आता कॅन्सरच्या रुग्णाच्या डोक्यावर आणखी एक भार येणार आहे. याचे कारण म्हणजेत कॅन्सर रुग्णाच्या औषधे महागणार आहेत, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. औषधांचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधांच्या किमती वाढवण्यासाठी मंजूरी देण्यात आली आली. आता सरकारने कोणकोणत्या औषधांच्या किंमतींमध्ये किती वाढ होणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

कॅन्सरच्या चार औषधांचा या यादीमध्ये समावेश आहे, कॅन्सर रुग्णांना मोठ्या प्रमाणात वापरत असलेल्या प्लॅटिनमआधारीत सिस्प्लॅटिन (Cisplatin) आणि कार्बोप्लॅटिन (Carboplatin) या केमोथेरपी औषधांच्या किंमती वाढणार आहेत. केंद्रीय औषध विभागाकडे चार औषधांच्या किमती वाढवण्यासाठी मंजुरी मागितली होती. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी (NPPA) ला मंजुरी मिळाल्यानंतर आता औषधांच्या किंमतींमध्ये 50% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

औषधांच्या किंमतींमध्ये किती वाढ होणार?

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीला मंजूरी मिळाल्यानंतर आता औषध विभागाने ज्याप्रकारे कच्च्या मालाचा खर्च वाढला आहे त्याचा आढावा घेतल्यानंतर औषधांच्या किंमतींमध्ये वाढ होणार असे सांगितले आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीच्या तपासणीनंतरच औषधांच्या किंमतीमध्ये अंतिम वाढ होणार आहे असे सांगण्यात आले आहे. रिपोर्टच्या मते औषधांची किंमत ही 10 ते 50% टक्के वाढणार असा अंदाज लावला जात आहे.

औषधांच्या किंमती वाढवण्याचे नक्की कारण काय?

अनेकांना प्रश्न असेल की का औषधांच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे? याचे कारण असे सांगण्यात आले आहे की, कॅन्सरच्या औषधांच्या निर्मितीसाठी जो कच्चा माल लागतो त्याच्या कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. प्लॅटिनमचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्च देखील वाढला आहे. औषधांच्या किंमती वाढण्याचे आणखी एक कारण सांगितले जात आहे की पश्चिम आशियातील तणाव, आयात शुल्क आणि चलन विनिमय दरांमध्ये वाढ झाल्यामुळे खर्च वाढत आहे असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *