रेल्वेच्या दुचाकी वाहनतळासाठी शुल्क वाढणार

रेल्वेच्या दुचाकी वाहनतळासाठी शुल्क वाढणार

रेल्वे स्थानकांबाहेर दुचाकी पार्क करण्यासाठी सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मुंबईतल्या रेल्वे स्थानकांबाहेर दुचाकी पार्क करण्यासाठी आता ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांबाहेर दुचाकी पार्क करण्यासाठी वीस रुपये मोजावे लागतात. परंतू आता मात्र हा दर परवडत नसल्याची तक्रार पार्किंगचे नियोजन करणा-या कंत्राटदारांनी केली आहे. त्यासाठी रेल्वे वाहनतळासाठी निविदा काढण्यात येणार आहे, त्यामध्ये ही दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे.

या दरवाढीविरोधात प्रवासी संघटनांनी निषेध नोंदवला आहे. दररोज उपनगरातून लाखो प्रवासी मुंबईत येत असतात, त्यासाठी प्रवासी घरापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकींचा वापर करतात. दुचाकी रेल्वे वाहनतळावर पार्क करुन त्यानंतरचा प्रवास रेल्वेने करतात. त्यामुळे ही दरवाढ झाल्याने अनेक दुचाकीस्वारांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *