ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक पिंपळेश्वर महादेव मंदिराचा अनेक वर्षांचा वाद मिटला आहे. डोंबिवलीमधील या मंदिराच्या जमिनीचा 20 वर्षांपासूनचा तिढा सुटला आहे. राज्य सरकारने मंदिरासाठी 4 एकर आणि 25 गुंठे जागा मंजूर केली आहे. यानिमित्ताने मंदिरात भव्य उत्सव साजरा केला जाणार आहे. 8 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहतील.
भव्य शिवोत्सवाचं आयोजन
सरकारच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये आनंद साजरा केला जात आहे. या घोषणेनंतर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीसह मंदिरात पोहोचून संकल्पपूर्ती पूजन केलं. मंदिरभूमीच्या जागेचा हक्क दिल्याच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यावेळी आभार मानले. यावेळी त्यांनी 8 जून रोजी साजरा होणाऱ्या भव्य शिवोत्सवाची माहिती दिली. या उत्सवात भजन-किर्तन कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. आणि उपमुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित असतील.
