रायगडमधील खालापूर येथील इमॅजिका वॉटरपार्कमध्ये 5 ते 6 वर्षाच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जैनब बक्स मूसा असे या मृत चिमुरडीचे नाव आहे. मुंबईतील मरोळ अंधेरी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
चिमुरडीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत खालापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत