सनी लिऑनला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते!

सनी लिऑनला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते!

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेली बेबी डॉल सनी लिऑन बुधवारी ठाणे पोलिस आयुक्तालयात तिच्या वकिलांसह हजर राहिली. तिच्यावर दाखल झालेल्या एका गुन्ह्याअंतर्गत चौकशीसाठी सनी लिऑन पोलिसांसमोर हजर झाली.

वेबसाईटवर अश्लील व्हिडीओ अपलोड करुन समाजात अश्लीलता परवल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली पालन यांनी रामनगर पोलिस स्टेशनमध्ये केली होती.

सनी लिऑन सुमारे दीड तास पोलिस आयुक्तालयात होती. सनीविरोधात भारतीय दंड विधान कलम 292, 292 अ आणि 34 अंतर्गंत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये सनी दोषी ठरली तर तिला पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

सनी लिऑनने तिच्या ब्लॉगवर अश्लील व्हिडीओ आणि फोटो अपलोड केले आहेत, जे तरुण पिढीसाठी विषाप्रमाणे आहे, असं पालन यांनी तक्रारीत म्हटलं होतं. तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने सनीला नोटीस बजावली आणि त्या नोटीसचं उत्तर देण्यासाठी सनी बुधवारी ठाणे पोलिस आयुक्तालयात वकिलांसह पोहोचली.

ठाण्याच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश सावंत यांनी सांगितलं की, सनी लिऑनविरोधात डोंबिवली पोलिस स्टेशनमध्ये आयटी अक्टअंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्याची नोटीस आम्ही सनीला पाठवली होती. सनीचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *