केजरीवाल-नायब राज्यपाल वादात केंद्राची उडी, भर विधानसभेत ‘आप’चा राडा

केजरीवाल-नायब राज्यपाल वादात केंद्राची उडी, भर विधानसभेत ‘आप’चा राडा

आम आदमी पक्षाच्या आमदारांनी केंद्र सरकारच्या आदेशाचं परिपत्रक भर सभागृहात फाडलं. दिल्लीत सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून ते पोलिस दलापर्यंतचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार केवळ नायब राज्यपालांना असल्याचा आदेश केंद्रानं जारी केला.

केंद्र सरकारच्या आदेशाचं परिपत्रक आम आदमी पक्षाच्या आमदारांनी भर विधानसभेत फाडलं आणि निषेध व्यक्त केला. संविधानानं दिल्ली सरकारला दिलेले सर्व आदेश काढून घेण्याचा घाट केंद्रानं घातल्याची टीका आपचे आमदार महेंद्र गोयल यांनी सभागृहात केली.

केंद्राच्या परिपत्रकाची प्रत फाडून आपला निषेध व्यक्त केला. त्यामुळे दिल्लीतल्या नायब राज्यपाल आणि सरकारमधील युद्धात आता केंद्र सरकारनंही उडी घेतल्यानं तिढा आणखी वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *