सामुद्रधुनी खुली, पण 19 कोटींचा शुल्क लागणार’ होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांसाठी इराणची नवी अट; भारतासह जागतिक व्यापार पुन्हा धोक्यात!

8 जून रोजी आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे ज्याचा परिणाम जागतिक तेल बाजार आणि सागरी व्यापारावर परिणाम होऊ शकतो. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाणार नाही, तर आता नवीन नियमांनुसार सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे हल्ला केल्यावर इराणने हा जलमार्ग रोखून धरलेला, ज्यामुळे या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जागतिक ऊर्जा पुरवठ्यापैकी जवळपास एक-पंचमांश पुरवठा विस्कळीत झाला.

होर्मुझ सामुद्रधुनीसाठी इराणनवीन निर्णय

जगाची ‘लाइफलाइन’ मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीबद्दल मॉस्कोमधील इराणच्या राजदूतांनी मोठं विधान केलं आहे. सोमवारी, मॉस्कोमधील इराणच्या राजदूतांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहील, पण इराण आणि ओमानने मान्य केलेल्या नवीन अटींनुसार, ज्यामध्ये ट्रान्झिट शुल्काचा समावेश असेल. “अर्थात ही सामुद्रधुनी खुली केली जाईल, पण इराणी आणि ओमानी अधिकाऱ्यांद्वारे निश्चित केल्या जाणाऱ्या नवीन अटींसह,” असे राजदूत काझेम जलाली यांनी सोमवारी प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत रशियन वृत्तपत्र Izvestia ला सांगितले.

इराणी राजदूतांच्या या विधानानंतर पश्चिम आशियातील युद्ध लांबत चालल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या जागतिक सागरी मार्गाच्या भवितव्यावर नवीन अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत मोठा व्यत्यय आला. तर याआधी जगातील एक-पंचमांश तेलाचा या सामुद्रधुनीतून पुरवठा केला जायचा. अलीकडे काही टँकर आखातातून यशस्वीपणे पार झाले, पण तेल आणि LNG यांच्या वाहतुकीत अजूनही गंभीर व्यत्यय आहे.

त्याचवेळी, ट्रान्झिट शुल्क त्या अरुंद मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर देशांकडून आकारल्या जाणाऱ्या सेवा शुल्कासारखेच असेल असेही जलाली यांनी पुढे सांगितले. “आम्हाला समजलं आहे की इराण आणि ओमान या सामुद्रधुनीशी संबंधित काही विशिष्ट सेवा पुरवतात. आणि त्या सेवांसाठी शुल्क आकारले जाईल,” असे त्यांनी अधिक तपशील न देता सांगितले.

होर्मुझवर शुल्क लादण्यावर अमेरिकेचा विरोध

अमेरिकेसोबत कायमस्वरूपी शांतता करारामुळे त्यांना सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारण्याची परवानगी मिळाली पाहिजे, जे जहाजाचा प्रकार, त्यावरील माल आणि तत्कालीन परिस्थितीनुसार वेगवेगळे असेल असाही इराणने दावा केला आहे. तर दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या प्रस्तावाला विरोध केला. तसेच मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकेने ओमानलाही इराणसोबत टोल आकारण्याच्या कोणत्याही प्रयत्नात सहभागी न होण्याचा इशारा दिला होता.

होर्मुझवर जहाजांकडून आकारला जातंय करोडोंचे शुल्क
त्याचवेळी, रविवारी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणारे प्रत्येक जहाज इराणला सरासरी 1.5 ते 2 दशलक्ष डॉलर्स देत असल्याचे फार्स न्यूज एजन्सीने संसदेच्या नियोजन आणि अर्थसंकल्प आयोगाचे सदस्य मोहसेन झंगनेह यांच्या हवाल्याने या नवीन टोलबद्दल माहिती दिली.

अमेरिकेने अद्याप या टोलला दुजोरा दिलेला नाही, उलट सातत्याने विरोध केला असून इराणच्या सरकारी फार्स न्यूज एजन्सीने ही प्रणाली अर्थ मंत्रालयाच्या सहकार्याने स्थापन केलेल्या एका संस्थेद्वारे राबवली जात आहे आणि इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या देखरेखीखाली कार्यरत असल्याचे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *