पुण्यातील महिला पोलीस सोनाली हिंगेचा पाय खोलात; अल्पवयीन मुलीचा वापर अन् खंडणी प्रकरणात आता कोर्टाकडून दणका

अल्पवयीन मुलीचा वापर करून नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत त्यांच्याकडून सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी बडतर्फ महिला पोलिस अंमलदार सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला.

आरोपीने पोलिस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात नसलेल्या महाविद्यालयाला भेट दिल्याचे पुरावे असून, गुन्हा नोंदवून घेण्याचे कर्तव्य पार पाडलेले नाही. इलेक्ट्रॉनिक पुरावे, छायाचित्रे, गुन्ह्यासाठी वापरलेली उपकरणे आणि खंडणीच्या रकमेची तपासणी करण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी आवश्यक आहे, असे नमूद करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी हा आदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *