भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जून महिन्यासाठी बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जून महिना सुरु व्हायला 2 दिवस बाकी आहेत. असं असताना सर्वात आधी जून महिन्यातील रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार पाहणार आहोत. तसेच या दिवसांमध्ये इतर दिवस कधी बँक बंद राहणार आहे. असा देखील प्रश्न पडत आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, अनेक राज्यांमध्ये सण आणि स्थानिक सुट्ट्यांमुळे बँका बंद राहतील. 13 जून, जो दुसरा शनिवार आहे, आणि 27 जून, जो चौथा शनिवार आहे, या दिवशी बँका बंद राहतील. याव्यतिरिक्त, देशभरातील बँकेच्या शाखा 7 जून, 14 जून, 21 जून आणि 28 जून, जे सर्व रविवार आहेत, या दिवशी बंद राहतील.
भारतातील बँकेच्या सुट्ट्या राज्यनिहाय ठरवल्या जातात, त्यामुळे प्रत्येक शहरात सुट्ट्यांच्या तारखा वेगवेगळ्या असू शकतात. म्हणून, ग्राहकांना बँकेत जाण्यापूर्वी त्यांच्या शहरातील सुट्ट्यांची माहिती तपासण्याचा सल्ला दिला जातो.
