मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशी या दरम्यान उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे.
मध्य रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग :अप आणि डाउन धीमा
वेळ : स. १०.५५ ते दु. ३.५५
परिणाम : अप, डाउन धीम्या लोकल अप, डाउन जलद मार्गावरून धावतील. मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड स्थानकात लोकल उपलब्ध नसतील.
हार्बर रेल्वे
स्थानक : कुर्ला ते वाशी
मार्ग : अप आणि डाउन
वेळ : स. ११.१० ते दु. ४.१०
परिणाम : सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेलदरम्यान अप आणि डाउन लोकल फेऱ्या बंद राहतील. विशेषफेऱ्या सुरू राहतील.
पश्चिम रेल्वेवर रात्रीचा ब्लॉक
मरिन लाइन्सच्या फलाट क्र.३ आणि ४ दरम्यान पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर १.१५ ते रविवारी प. ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक. चर्चगेटसाठी शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता विरारवरून रवाना होईल. चर्चगेटहून पहिली धीमी लोकल रविवारी प. ४.४६ आणि पहिली जलद लोकल प. ४.४० ला धावेल.
एक्स्प्रेस, लोकलला फटका
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याला निघालेल्या डेक्कन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी सकाळी खोळंबली. दुरुस्तीनंतर हे इंजिन सुरू न झाल्याने पर्यायी इंजिनच्या मदतीने दीड तासानंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांसह लोकल प्रवाशांनाही याचा फटका बसला. डेक्कन एक्स्प्रेस ‘सीएसएमटी’हून स. ७ वाजता रवाना झाली. वांगणी आणि नेरुळ स्थानकादरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती जागीच उभी राहिली. दुरुस्तीचा प्रयत्न अपयशी ठरल्याने पर्यायी इंजिनची मागणी करण्यात आली. कर्जतहून पर्यायी इंजिन स.९.२५ वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. ते एक्स्प्रेसला जोडल्यावर १०.१५च्या सुमारास ती रवाना झाली.
