अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून विवाहित प्रेयसीने तिच्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पेठरोडवरील नवनाथनगर भागात सोमवारी मध्यरात्री घटना घडली.
अमोल दांडगे केल्याची पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी महिलेस ताब्यात घेतले असून, या हत्याकांडात आणखी दोन महिलांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अमोल पंढरीनाथ दांडगे (वय २६, रा. हनुमानवाडी, पंचवटी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मोठा भाऊ संदीप पंढरीनाथ दांडगे याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित महिला सोनाली राजेंद्र गायकवाड (३६, नवनाथनगर) हिच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत अमोल हा अविवाहित होता, तर संशयित आरोपी सोनाली विवाहित आहे. या दोघांमध्ये काही काळापासून प्रेमसंबंध होते, त्याला अमोलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, घरच्यांचा विरोध झुगारून अमोल पंधरा दिवसांपूर्वीच हनुमानवाडीतील घर सोडून पेठरोडवरील नवनाथनगर येथील साळवे चाळीत सोनालीसोबत भाड्याच्या खोलीत ‘लिव्ह-इन’ मध्ये राहण्यास आला होता.
..या वादामुळे कृत्य
सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, वो मध्यरात्री एकच्या सुमारास अमोल आणि सोनाली यांच्यात पैशाच्या न देवाणघेवाणीवरून आणि अनैतिक संबंधांवरून जोरदार वाद झाला. हा , वाद इतका विकोपाला गेला, की रागाच्या भरात संशयित सोनालीने अज्ञात वस्तूच्या सहाय्याने अमोलचा गळा आवळला. त्यात अमोलचा, गुदमरून मृत्यू झाला.
.. असा झाला उलगडा
अमोल निपचित पडल्यानंतर सोनालीने घाबरून शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने डॉक्टरांना ‘अमोल चक्कर येऊन पडला,’ असे सांगत बनाव रचून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासणीदरम्यान अमोलच्या गळ्यावरील काळे व्रण पाहून डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले. अखेर शवविच्छेदन अहवालात अमोलचा मृत्यू गळा आवळल्यानेच झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सोनालीचा बनाव खोडून काढत तिला ताब्यात घेतले.
