नागपुरकरांसाठी बातमी! अनेक भागांत आज वीजपुरवठा राहणार बंद; देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरणाचा निर्णय

मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे आज, बुधवारी सिव्हील लाइन्स विभागातील क्लार्क टाऊन या वीज वाहिनीबरोबरच काँग्रेसनगर व बुटीबोरी विभागातील काही वाहिन्यांवरील वीजपुरवठा बाधित राहणार आहे. यामुळे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंतच्या काळात बंद राहणार आहे.

महावितरणच्या माहितीनुसार देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काँग्रेसनगर विभागातील पांढराबोडी, ट्रस्ट लेआउट, देवतळे लेआउट या भागात सकाळी ७.३० ते १०.३०, तर अजनी ते ऑरेंज सिटी चौक, देवनगर, सावरकरनगर, एलआयसी कॉलनी या भागात सकाळी ७ ते १० या वेळेत वीजपुरवठा बंद राहील. त्याचबरोबर तेलंगखेडी, मरारटोली, पीएनटी कॉलनी, कर्वेनगर, उज्ज्वलनगर, पावन भूमी, पर्यावरणनगर, श्रीरामनगर, कॉस्मोपॉलिटन, सरस्वती विहार, लोखंडेनगर, पठाण लेआउट, संभाजीनगर, भांगे लॉन, भाग्यश्री लेआउट, कॉसमॉस टाऊन, द्रोणाचार्यनगर, गोरले लेआउट या भागात सकाळी ७ ते ११ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल.

तर सकाळी ८ ते ११ या वेळेत सुजाता लेआउट, गांधी बिल्डर, अग्ने लेआउट, स्वावलंबीनगर, सरस्वतीनगर, दीनदयाळनगर या भागात वीज राहणार नाही. स्वागत प्राणी संग्रहालय, ऐश्वर्या लेआउट, शिवशक्ती लेआउट, सीजीएचएस सोसायटी, सोनेगाव या भागात सकाळी ७.३० ते १० या वेळेत, तर हिरणवार लेआउट, आनंदनगर, घरकुल परिसर या भागात सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत काही भागात वीज बंद राहील. सकाळी ७ ते ११ या वेळेत गायत्रीनगर, परसोडी, दत्त मंदिर, श्रीनगर, हनुमान मंदिर परिसर, गोपाळनगर, नाईक लेआउट, फायर क्वार्टर, विजयनगर, हिमाला प्रेस्टिज, शेवाळकर गार्डन, ईटीएस कॉलनी आणि आयटी पार्क या भागात वीजपुरवठा खंडित राहील.

सिव्हील लाइन्स विभागात ७ ते ११ या वेळेत सिंधी कॉलनी, कडबी चौक, ख्रिश्चन कॉलनी, लुंबिनीनगर आणि क्लार्क टाऊन परिसरातील वीजपुरवठा बंद राहील. तर बुटीबोरी विभागात सकाळी ९ वाजेपासून करमतारा, सूर्यकिरण, हिंदुस्तान, जयस्वाल निको, कॅडेलरिस, रुची सोया, इन्व्हेंटरी आणि प्रीमियर इरिगेशन या औद्योगिक ग्राहकांचा, त्यानंतर दुपारी १ ते २.३० या वेळेत ए-झोन फेज २, एसझेड-झोन आणि एसएझेड फूड या भागातील वीजपुरवठा बाधित राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *