आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन 22 तासांनी संपलं, 8 बॉडीज दरीतून बाहेर; दृश्य बघून सगळ्यांचाच कंठ दाटला

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात स्कार्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळून तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. शेवटचा मृतदेह रात्री 8 वाजता दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आणि तब्बल 22 तासांनी रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान ट्रेकर्संना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाडच्या सिस्केप टीमने हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं.

पावणेदहा वाजता फोन आणि…

आंबेनळी घाटात एक स्कार्पिओ गाडी दरीत कोसळलीअसल्याचा मेसेज महाबळेश्वर ट्रेकर्सला काल रविवारी रात्री पावणेदहा वाजता मिळाला. त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिकेत वागदरे, सोमनाथ वागदरे, संकेत सावंत हे घटनास्थळाकडे रवाना झाले. आंबेनळी घाटातील एका ठिकाणी टॉर्च मारला असता संशयास्पद परिस्थिती दिसली. बाकी सदस्यांना बोलावून घेण्यात आलं. काही वेळात टीमचे सदस्य साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले.

वाकलेल्या झाडामुळे संशय बळावला

ट्रेकर्संनी सेटअप तयार करून रोपच्या सहाय्याने दरीत उतरायला सुरुवात केली. खाली पोहोचल्यानंतर एक गाडी दिसली. ती पुर्वीच्या अपघातातील होती. मग दुसऱ्या बाजूने पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत महाडची सिस्केप टीमही मदतीसाठी दाखल झाली. एका ठिकाणी महाबळेश्वर ट्रेकर्संचे सदस्य कुमार भाऊ शिंदे, अनिकेत वागदरे यांना एक बोर्ड वाकल्यासारखा दिसून आला. तसेच वाकलेल्या झाडामुळे गाडी इथूनच दरीत कोसळल्याचा संशय बळावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *