दहा कोटींचा खर्च वाया; रिंगरोडसाठी खोदले दोन वर्षांपूर्वी बनविलेले सर्व्हिसरोड

 खासदार निधीतून दहा कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या सिन्नर फाटा ते गाडेकरमळा दरम्यानच्या जवळपास दीड किलोमीटर लांबीच्या साडेसात मीटर रुंदीच्या दोन सर्व्हिस रोडचा दोन वर्षांतच रिंगरोडच्या नावाखाली बळी देण्यात आल्याचा प्रकार नाशिकरोड येथे घडला आहे.

विशेष म्हणजे, हे दोन्ही रस्ते पूर्णतः खणून काढण्यात आले असून, संपूर्ण रिगरोड देखील वीस मीटर पूर्वेस सरकविण्यात आला आहे. परिणामी, संपूर्ण दहा कोटीचा खर्च वाया गेला असून, पालिका आयुक्तांच्या नजरेत हा प्रकार का आला नाही, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *