नागरिक सध्या वाढत्या उष्म्याने हैराण झाले असताना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पाऊस यंदा लवकर दाखल होणार आहे. हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून 26 मे रोजीच दाखल होणार असल्याची माहिती दिली होती. पण या मान्सूनला सध्या दोन दिवस उशीर होईल असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनसाठी जूनची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज आहे.
28 मे ते 3 जून दरम्यान मान्सून
अंदामान आणि निकोबार बेटांवर मान्सीन 16 मे रोजीच दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसगरातून हे वारे हळूहळू पुढे सरकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, दक्षिण केरळमध्ये आयएमडीने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून राज्यातील उर्वरित भागात यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून 26 मे रोजी दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, राज्यात 28 मे पर्यंत यलो अलर्टच दिला आहे. त्यानंतर केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदा मान्सून 28 मे ते 3 जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोमवारी मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. येत्या 24 तासांत मुंबईसह उपनगरात हलका पाऊस होण्याची शक्यता असून कोकणात मेघर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, वर्धा, अमरावती आणि अकोल्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
उन्हाच्या तडाख्याने 700 वटवाघुळांचा मृत्यू
दरम्यान, वाढत्या उष्णतामानामुळे सिरोंच तालुक्यातील ७०० वटवाघळांच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटन रविवारी समोर आली. या मृत वटवाघळांचे नमुने तपासणीसाठ पाठविण्यात आली आहे.
सिरोंचा येथील जिल्हा परिष शाळेमागील वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात अनेक वर्षांपासून हजारोंच्या संख्येने वटवाघुळांचे दिसून येतात. दिवसभझाडांच्या फांद्यांवर उलट्या अवस्थेत लटकून विश्रांती घेणारी आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडणारी वटवाघुळे वाढता उष्मा सहन करू शकली नाही. गेल्या दोन दिवसांत शेकडो वटवाघुळे झाडाखाली मृत अवस्थेत आढळून आली. काहींच मृतदेह अजूनही झाडांवर लटकलेल्य अवस्थेत आहेत. याविषयीची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी
