मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी, अकोल्यातील घटनेने संताप

अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला अर्थात टीसी काढण्यासाठी शाळेत गेलेल्या महिलेकडे तेथील कर्मचाऱ्याने शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूर येथील एका शाळेत पीडित महिला आपल्या मुलीचा टीसी काढण्यासाठी गेली होती. यावेळी शाळेतील मनीष शर्मा नामक कर्मचाऱ्याने महिलेशी अयोग्य वर्तन करत टीसी देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिला हादरली असून तिने तात्काळ बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून शैक्षणिक संस्थांमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *