आखाती देशात भारताचा चांगला मित्र असलेला देश यूएईने (UAE) तेल निर्यातीसाठी नवीन उपाय शोधून काढला आहे. यूएई आपल्या तेल निर्यातीसाठी एक नवीन पाईपलाईन तयार करत असून त्याचं नाव वेस्ट-ईस्ट पाईपलाईन असं ठेवण्यात आलं आहे. ही पाईपलाईन सुरु झाल्यावर यूएई होर्मुज स्ट्रेटवर अवलंबून राहणार नाही. युद्धामुळे होर्मुज स्ट्रेट बंद असला तरी यूएईचं तेल कोणत्याही अडचणी शिवाय सप्लाय होत राहिलं. तेलाने त्याच्या कमाईवर कोणताही प्रभाव पडणार नाही.
या पाईपलाईनची सुरुवात अबूधाबीच्या जवळ असलेल्या हाबशान ऑयल एंड गॅस फिल्डने होईल. पाईपलाईनचा वापर करून हाबशानला फुजैरा पोर्टशी जोडलं जाईल. फुजैराह हे ओमानच्या आखातावर वसलेले संयुक्त अरब अमिरातीचे एक बंदर आहे. महत्त्वाचे म्हणजे, फुजैराह बंदरातून होणाऱ्या तेल निर्यातीला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची गरज नसते. हबशान आणि फुजैरा बंदर यांच्या दरम्यान आधीच एक पाइपलाइन आहे आणि आता तिला समांतर दुसरी पाइपलाइन बांधली जात आहे.
