मुंबई विमानतळापेक्षा नवी मुंबई विमानतळावरील विमानप्रवास महागला, 1 जूनपासून नवीन शुल्क लागू

मुंबईतील सांताक्रूझ आणि अंधेरी विमानतळानंतर नवी मुंबईत विमानतळ सुरु करण्यात आलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. त्यानंतर या विमानतळावर पोहोचण्यासाठीचा खर्च हा विमान तिकीटपेक्षाही महाग आहे. तर आता त्यात अजून एक भर म्हणजे 1 जून 2026 पासून विमान तिकीट महाग होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई विमानतळापेक्षा नवी मुंबई विमानतळाचा प्रवास महाग असणार आहे. यामागील कारण म्हणजे वापरकर्ता विकास शुल्कात वाढ करण्यास भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने मंजुरी देण्यात आली.

आता  1 जून 2026 पासून नवी मुंबई विमानतळावरील विमान तिकीटात वापरकर्ता विकास शुल्क लावले जाणार आहे. या वाढीव शुल्कानुसार नवी मुंबई विमानतळावरील देशांतर्गत 620 आणि आंतरराष्ट्रीय 1225 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीव वापरकर्ता विकास शुल्कामुळे विमान तिकीट महागणार आहे. मुंबई विमानतळाच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील शुल्क जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *