WHO चा फॉर्म्युला वापरला अन् विजेचे बिल 70% पेक्षा कमी! रूमही ठेवेल अतिशय थंड; जाणून घ्या AC चालवण्याची योग्य पद्धत:

सध्या प्रचंड उन्हाळा आहे. या कडक गरम वातावरणात एसी तर हवाच! अनेकजण रात्री एक मिनिटही एसी बंद करत नाही. अशावेळी विजेचं बिल येणं स्वाभाविक आहे.  अशा परिस्थितीत काही साध्या पण स्मार्ट पद्धतींचा अवलंब केल्यास खोली थंड ठेवता येते आणि वीजखर्चही लक्षणीय प्रमाणात कमी करता येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. आज आपण थेट WHO ने दिलेला फॉर्म्युला  काय आहे याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. या फॉर्म्युलामुळे तुमचं विजेचे बिल 70% पेक्षा कमी होऊ शकते. याशिवाय रूमही ठेवेल अतिशय थंड ठेवेल. चला या फॉर्म्युलाबद्दल जाणून घ्या.

किती तापमान ठेवणं गरजेचं? 

अनेक जण एसी थेट 16 किंवा 18 डिग्रीवर सेट करतात, कारण कमी तापमान ठेवल्यास खोली पटकन थंड होईल असा सामान्य समज आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते ही पद्धत चुकीची असून त्यामुळे एसीच्या कंप्रेसरवर जास्त ताण येतो आणि वीज जास्त खर्च होते. त्यामुळे अधिक योग्य आणि कार्यक्षम तापमान म्हणजे 24 ते 26 डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवणे होय. या रेंजमध्ये एसी सतत जास्त मेहनत न करता स्थिर थंडावा देतो आणि ऊर्जा बचतही होते.

एसीसोबत फॅन वापरायचा?

खोली अधिक प्रभावीपणे थंड ठेवण्यासाठी एसीसोबत सीलिंग फॅनचा वापर करणे अत्यंत उपयुक्त मानले जाते. फॅन मध्यम गतीने चालवल्यास एसीमधून येणारी थंड हवा खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात समान प्रमाणात पसरते. यामुळे एकाच ठिकाणी थंड हवा साचत नाही आणि संपूर्ण वातावरणात संतुलित थंडावा निर्माण होतो. परिणामी, एसीला जास्त वेळ आणि जास्त पॉवरवर चालवण्याची गरज भासत नाही.

खोली कशी सेट करायची? 

याशिवाय खोलीतील खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर थंड हवा बाहेर निघाली किंवा बाहेरील गरम हवा आत आली तर एसीला अधिक काम करावे लागते आणि वीजबिल वाढते. त्यामुळे योग्य इन्सुलेशन आणि सीलिंग केल्यास एसीची कार्यक्षमता वाढते.

एसी वापरताना काय काळजी घ्यायचं? 

रात्री झोपताना एसी वापरताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. झोपेच्या वेळेस 24 ते 26 डिग्री तापमान ठेवणे अधिक सुरक्षित आणि आरामदायक मानले जाते. या तापमानावर शरीराला नैसर्गिक आराम मिळतो आणि अचानक थंड वातावरणामुळे होणारा त्रास टाळता येतो. यासोबत सीलिंग फॅन ‘लो स्पीड’वर चालू ठेवल्यास खोलीत एकसमान थंडावा राहतो आणि एसीचा लोड कमी होतो.

कोणता मोड महत्त्वाचा? 

एसीमधील ‘स्लीप मोड’ (Sleep Mode) फिचरचा वापर करणेही अत्यंत फायदेशीर ठरते. हे मोड हळूहळू तापमान समायोजित करते, ज्यामुळे रात्री जास्त वीज खर्च होत नाही आणि झोपही अधिक आरामदायक होते.

वीजबिलात मोठी बचत

या सर्व पद्धतींचा नियमित वापर केल्यास वीजबिलात मोठी बचत होऊ शकते. काही अहवालांनुसार योग्य सेटिंग आणि वापर पद्धती वापरल्यास वीजबिल 50 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ थंडावा नाही तर आर्थिक बचत आणि आरोग्यदायी वातावरण दोन्ही मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *