गीताने व्यक्त केली सलमानला खानला भेटण्याची इच्छा

गीताने व्यक्त केली सलमानला खानला भेटण्याची इच्छा

चौदा वर्षापूर्वी अपघाताने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करणारी गीता परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने भारतात परतणार आहे. भारतात परतल्यावर गीताने सलमान खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

२६ ऑक्टोबर रोजी गीता तिच्या कुटुंबीयांना भेटण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने गीताला आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्ही तिला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देऊ, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

भाषातज्ज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित यांनी गीतासोबत चर्चा केल्यानंतर तिने मी माझ्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत सलमानला भेटण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. माझे कुटुंब मला परत मिळवून देण्यात सलमानचे मोठे श्रेय असल्याचे गीता म्हणते.

सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ देश-विदेशात भरपूर प्रसिद्ध झाला. पाकिस्तानातही या चित्रपटाला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद लाभला. या चित्रपटानंतर पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी गीताची व्यथा जगासमोर मांडली होती. या घटनेची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दखल घेऊन यंत्रणेला पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते. भारत सरकारच्या प्रयत्नांना पाकिस्ताननेही प्रतिसाद दिल्याने गीताला अखेर तिचे कुटुंबीय परत मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *