इंद्राणीला ३१ ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहन चालक श्यामवर राय या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ ऑक्टोंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

श्यामवर रायने तुरुंग प्रशासनाच्या माध्यमातून न्यायालयात अर्ज केला असून, या अर्जात त्याने न्यायालयाला आपल्याला सत्य सांगायचे आहे असे म्हटले आहे. न्यायालय त्याच्या नावाने प्रोडक्शन वॉरंट काढण्याची शक्यता आहे.


शीना बोरा हत्या प्रकरणात माहिती गोळा करण्यासाठी सोमवारी सीबीआयने पाच शहरातील नऊ ठिकाणी छापे घातले. सीबीआयच्या पथकाने इंद्राणी आणि पीटरच्या मुंबई, गोव्यातील निवासस्थानी, गुवहाटीमध्ये तसेच श्यामावर रायच्या मुंबई, मध्यप्रदेशातील निवासस्थानी आणि संजीव खन्नाच्या कोलकातामधील निवासस्थानी छापे घातले.

शीना ही इंद्राणीची मुलगी होती. शीना इंद्राणीला पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. शीनाची हत्या केल्यानंतर २४ एप्रिल २०१२ रोजी रायगडच्या जंगलात तिघा आरोपींनी मिळून शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *