पुण्यातील बालाजीनगर गोळीबार प्रकरणी आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल; 6 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यातील बालाजीनगर गोळीबार प्रकरणी बंडू आंदेकर आणि आंदेकर टोळीवर (Andekar Gang Firing) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदल्याची भूमिकेतून आंदेकर टोळीने अक्षय म्हस्केवर हल्ला केल्याची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. गोळीबारात जखमी अक्षय म्हस्केवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वनराज आंदेकर खूनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने अक्षय म्हस्केला मारण्याचा कट रचला. सहकारनगर पोलिस ठाण्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, रामजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर यांच्यासह आणखी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Andekar Gang Firing Pune Crime News)

खालील प्रमाणे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत- (Andekar Gang Firing Pune Crime News)

1) निदेश अमोल विंचुरकर, वय 15, रा. 238, नाना पेठ, अशोक चौक, पुणे

2) आफ्ताफ शरीफ सय्यद, धंदा. एसी काम, रा. भाग्यदेव नगर, वैशाली नर्सिंग होम, कोंडवा खुर्द.

3) ऋषी प्रसाद मोहन आंबट, वय 21, धंदा. हमाल, रा. तालीम, नाना पेठ, नवरंग मित्र मंडळ जवळ, पुणे.

4) आवेज अशपाक शेख, वय 26, धंदा. मासे विक्री, रा. 271, गणेश पेठ,

5) वेदांत श्रीनिवास टेमगिरे, वय 19, रा. 60 भवानी पेठ, पालखी विठोबा चौक, पुणे

6) अमन फारूक बागवाले, वय 21, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठ जवळ, पुणे

नेमकं प्रकरण काय? (Andekar Gang Firing)

अक्षय उर्फ बाळा मस्के हा रिक्षा चालक असून तो काल (20 मे) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बालाजी कॉर्नर येथे आला होता. मात्र त्याच्या हालचालींवर आधीपासून नजर ठेवून असलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर गोळीबार केला. अंदाजे पाच गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गोळ्या लागल्यानंतर अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. अक्षय उर्फ बाळा मस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या आकाश मस्केचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश मस्के सध्या नाशिक कारागृहात बंद आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे जुन्या गँगवॉरचा अँगल असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वनराज आंदेकरच्या खुनानंतर पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने काही जणांना टार्गेट केल्याची चर्चा आधीपासूनच गुन्हेगारी वर्तुळात सुरू होती. त्यानंतर शहरात सलग खून, हल्ले आणि गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत. आजचा हल्लाही त्याच साखळीतील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुण्यात पुन्हा गँगवॉर डोकं वर काढतेय का? (Andekar Gang Firing)

अक्षय उर्फ बाळा मस्के हा आंबेगाव पठार परिसरात पत्नी आणि लहान मुलीसोबत राहत होता. मागील काही दिवसांपासून काही संशयित व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याची जाणीव त्यालाही झाली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. रात्री उशिरा बाहेर जाणं त्याने बंदही केलं होतं. मात्र, भरदिवसा सकाळीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि पुन्हा एकदा पुण्यातील गँगवॉर उघड्यावर आली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोर कोण होते? त्यांनी आधीपासून रेकी केली होती का? आणि या हल्ल्यामागे नेमकं कोणतं वैर आहे? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून “पुण्यात पुन्हा गँगवॉर डोकं वर काढतेय का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *