गरीब नगरमधील कारवाईचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा; 50 नव्या एक्सप्रेस ट्रेन, वांद्रे टर्मिनसचा कसा होणार विस्तार?

वांद्रे पूर्वेकडे गरीबनगरमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम पश्चिम रेल्वेने हाती घेतली आहे. आज या पाडकामाचा तिसरा दिवस असून, दुसऱ्या दिवसाअखेर 60 टक्के काम पूर्ण झालं होतं. यावेळी अनाधिकृतपणे राहणाऱ्या हजारो नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. काही काळ तणावपूर्व स्थितीही निर्माण झाली होती आणि पोलिसांना ही परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. पण हे अतिक्रमणे गेल्या अनेक वर्षांत अनेक वेळा हटवण्यात आले आहेत. पण रेल्वेची जागा रिकामी राहिली की पुन्हा हे स्थानिक येथे वास्तव करतात. पण यावेळी पश्चिम रेल्वे वांद्रे रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार आहे.

5300 चौरस मीटर जागा

ही कारवाई पूर्ण होताच सर्व प्रथम गरिबनगर येथील सुमारे 5300 चौरस मीटर जागेभोवती कुंपण घालण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या काही वर्षांत वांद्रे टर्मिनसचा पूर्वेकडे विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर फलटांची संख्या वाढवण्यासह इतर पायाभूत सुविधांचाही विस्तार केला जाणार आहे. 23 मेपर्यंत ही पाडकाम प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जमीन सुरक्षित करून सर्व प्रकल्पांच्या कामांना सुरूवात केली जाईल.

सध्या वांद्रे टर्मिनस स्थानकावरून 22 मेल-एक्सप्रेस सुटतात. येत्या काही वर्षांत ही संख्या 50 टक्क्यांनी वाढणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातून 50 नव्या मेल-एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. अनेक वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर गरीबनगर येथील अतिक्रमण हटवण्यात यश मिळाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.

कसा होणार विस्तार?

वांद्रे टर्मिनसच्या विकासासह पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारामध्येही या कारवाईने मोठा फायदो होणार. सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या बांधकामाला वेग मिळणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरी मेल / एक्सप्रेस आणि लोकलची वाहतूक विभागून वाहतूक कोंडी कमी करण्यात मदत होणार आहे. तसेच, नव्या बुलेट ट्रेन प्रकल्पालाही मोठा फायदा होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरच हे अनाधिकृत बांधकामं होती. त्यामुळे संकुलात उभारल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत कनेकटीव्हीटी मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *