अनेक वर्षांनंतर भारतात ‘सुपर एल निनो’; उष्णतेच्या तीव्र लाटा अन् दुष्काळ, हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर

भारतीय उपखंडामध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या लाटा अधिक काळ टिकणाऱ्या, अधिक तीव्र आहेत. तसेच त्यांची वारंवारता वाढत आहे. या लाटांसंदर्भात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये एल निनो आणि तीव्र तापमानाचा संबंध असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. एल निनो असलेल्या वर्षांमध्ये ला निनाच्या वर्षांपेक्षा उष्णतेच्या लाटांची व्याप्ती आणि तीव्रता अधिक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

एल निनो आणि ला निनोचा परिणाम

संपूर्ण भारतामध्ये उष्णतेच्या लाटांमध्ये एल निनोच्या काळात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. मान्सूनपूर्व काळामध्ये एल निनोमुळे कमाल तापमानात मोठ्या फरकाने वाढ होते. यामध्ये मध्य भारतासोबतच वायव्य भारत, दक्षिण भारताचा काही भाग यावर अधिक परिणाम होताना दिसतो. ला निनाच्या वर्षांमध्ये उष्णतेच्या लाटांचे प्रमाण कमी होते आणि तुलनेने कमाल तापमानही कमी असते. एल निनो सक्रिय असताना पावसात घट होते. तसेच मातीमध्येही आर्द्रतेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. एल निनो आणि ला निना सक्रिय असताना उष्णतेचा परिणाम नेमका कसा होतो हे समजून घेतले तर त्यानुसार उष्णतेच्या लाटांना तोंड देताना प्रशासन आणि नागरिकही अधिक तयार राहतील, असे डी. एस. पै आणि स्मिता नायर या अभ्यासकांनी स्पष्ट केले.

नागरिकांना अतिउष्ण वातावरण जाणवत असताना तापमानाचा पारा मात्र फारसा चढा नसतो. या पार्श्वभूमीवर लोकांना होणारी उष्म्याची जाणीव आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा यामध्ये फरक असल्याचे दिसते. यासाठी देशातील उष्णतेच्या लाटेची घोषणा करण्याचे निकष भारतीय हवामान विभाग बदलणार असल्याचे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. सध्याच्या निकषांच्या मर्यादांमुळे उष्णतेच्या लाटेचे इशारे देण्यात अडचण येत असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रात्रीही उष्ण वातावरण

केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे उष्णता आणि आर्द्रतेला सामोरे जावे लागले. भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ अशा प्रणाली निर्माण होत नव्हत्या. त्यामुळे या उष्णतेच्या जाणिवेसाठी पूर्वीचे अनुभव साह्यभूत ठरले नाहीत, असेही सांगण्यात आले. अशी प्रणाली भारताच्या वायव्य भागांवर आढळते, परंतु यंदा ती दक्षिणेकडील प्रदेशाजवळ तयार झाली, ज्यामुळे रात्री उष्ण वातावरण निर्माण झाले. या आधारे येत्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि त्यासंदर्भातील इशारे यामध्ये बदल करण्यात येईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आह

वाढत्या उष्म्याने शेतमालाचे नुकसान

यंदाच्या उन्हाळ्यात उष्मा अधिकच वाढल्याने याचा शेतमालावर परिणाम होत आहे. भाजीपाला, फळे, कांदे-बटाटे हा शेतमाल मुंबईच्या बाजारात येईपर्यंत प्रवासात मालाचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या मालाचा तुटवडा भासत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *