कॉक्ररोच जनता पार्टीचं इनस्टाग्राम अकाउंट हॅक, फॉलोअर्सची संख्या घटली?; अभिजीत दीपके काय म्हणाले…

कॉकरोच जनता पार्टीने आज शनिवारी सकाळी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की, त्यांचं इंस्टाग्राम अकाउटं हॅक झालं आहे. पार्टीला ते ॲक्सेस करता येत नाहीये. इंस्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स आता 2 कोटी 17 लाख झाले आहेत. पार्टीच्या एक्स अकाउंटवरही फॉलोअर्सची संख्या 1 लाख 93 हजार झाली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी काल शुक्रवारी दावा केला होता की, त्यांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यांनी याचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते.

अभिजीत यांचे वडील काय म्हणाले?

दीपके यांनी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. इकडे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे अभिजीत यांचे आई-वडील मुलाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चिंतेत आहेत. अभिजीत यांच्या वडिलांनी सांगितलं की, ‘आजचे वातावरण पाहून भीती वाटणं स्वाभाविक आहे.

अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील असून सध्या शिक्षणानिमित्त अमेरिकेतील बोस्टन येथे आहेत. अभिजीत यांचे वडील भगवान आणि आई अनिता दीपके यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, ‘आम्हाला आमच्या मुलाला राजकारणात पाठवायचं नाही. अभिजीतच्या या पावलाबद्दल ऐकून आमच्या रात्रीची झोप उडाली आहे’. अभिजीतच्या वडिलांनी सांगितलं की, ‘आजचं वातावरण पाहून भीती वाटणं स्वाभाविक आहे. त्याचे कितीही फॉलोअर्स असले तरी त्यांनी भारतात परतल्यावर त्याला अटक होण्याची भीती व्यक्त केली आहे. तो प्रसिद्ध झाला आहे, आणि अशा लोकांना अनेकदा अटक केली जाते. गेल्या दोन रात्रींपासून त्याच्यासोबत काय होऊ शकतं, या चिंतेत मी झोपू शकलो नाहीय’, असं अभिजीतच्या वडिलांनी म्हटलं.

आई काय म्हणाली?

अभिजीत यांच्या आईनं सांगितलं की, ‘आम्हाला कॉक्ररोच पार्टीबद्दल आमच्या एका शेजाऱ्याकडून कळलं होतं. मला वाटतं की माझ्या मुलाने राजकारणापासून दूर राहावं. तो ‘आप’सोबत काम करत होता. त्यावेळीही मी त्याला सांगितलं होतं की, आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आणि त्याने कोणतीतरी नोकरी करावी’.

अभिजीत दीपकेंचा व्हिडिओ

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, ‘आम्ही एक याचिका सुरू करणार आहोत. ज्यात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तुम्ही सर्वांनी या याचिकेवर जास्तीत जास्त सह्या करा, जेणेकरून सिस्टीमच्या चुकीवर प्रश्न विचारता येतील. काल शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत ऑनलाइन याचिकेवर 4 लाख 86 हजारांहून अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *