पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 38 टक्के जागा अधिग्रहण करण्याचे काम सध्या सुरू असून येत्या 15 जूनपर्यंत हे पूर्ण करण्याचं पुणे जिल्हा प्रशासनाचं उद्दिष्ट आहे. सध्या शेतकऱ्यांकडून संमतिपत्रे मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
150 कोटी रुपये रक्कम खात्यात जमा
पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधून विमानतळासाठी भूखंडाची गरज आहे. यामध्ये 1,216 हेक्टर म्हणजेच 3,040 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यापैकी सुमारे 1,152 जागेसाठी प्रतिज्ञापत्र प्राप्त झाले आहे. पुण्याचे जिल्हाधिकार जितेंद्र डुडी यांनी याबद्दल सोमवारी माहिती दिली. त्यावेळी त्यांनी भूसंपादन प्रक्रीया सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती दिली. मोबदल्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे प्रक्रियेला वेग मिळाला आहे. शेतकऱ्यांना 1.61 कोटींपर्यंत मोबदला मिळणार असून गेल्या आठवड्यापर्यंत 150 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
