एलपीजीचे दर कधीही वाढू शकतात! जाणून घ्या आजचे महाराष्ट्रातील आजचे LPG आणि PNG दर

एलपीजी गॅसच्या दरांबाबत पुन्हा एकदा बाजारात चर्चा सुरू झाली आहे. मिडल ईस्टमधील तणाव वाढत असल्यामुळे कच्च्या तेलासह गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सध्यातरी देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती, पश्चिम आशियातील तणाव आणि पुरवठा साखळीवरील दबाव यामुळे पुढील काळात दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतातील IOCL, BPCL आणि HPCL या सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी दरांचा आढावा घेतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *